Bhosari Crime News : भावाचा खून करून पसार झालेल्या आरोपीला साथीदारासह अटक

एमपीसी न्यूज – भावाचा खून करून पसार झालेल्या आरोपीला साथीदारासह अटक करण्यात एमआयडीसी भोसरी पोलिसांना यश आले आहे. अवघ्या सहा तासांत पोलिसांनी या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेतले.

अक्षय ज्ञानेश्वर बो-हाडे (वय 22, रा. सिल्वर ब्लू हॉटेल मागे, बो-हाडेवाडी, मोशी) व त्याचा साथीदार संदीप दिलीप सुरवसे (वय 24, रा. बो-हाडे वस्ती, जुना जकातनाका, मोशी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय ज्ञानेश्वर बो-हाडे याने आपला भाऊ मनोज ज्ञानेश्वर बो-हाडे (वय 25) याचा आईशी भांडण करतो, बाईवर पैसे उडवतो म्हणून गुरुवारी (दि.06) दुपारी खून केला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक सचिन चव्हाण तसेच अमंलदार आरोपीचा शोध घेत होते.

दरम्यान, बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपींना ताडीवाला रोड, बंडगार्डन येथून शुक्रवारी (दि.07) सकाळी दहा वाजता ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपींना 11 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.