Bhosari Crime News : अवैध दारू विक्रेत्यांवरील कारवाईदरम्यान पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की

एमपीसी न्यूज – अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या आरोपींनी पोलिसांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना मंगळवारी (दि. 13) रात्री सव्वाआठ वाजता महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी येथे घडली.

महेंद्र सुदाम कदम (वय 30, रा. महात्मा फुले नगर, भोसरी), हनुमंत उर्फ आप्पी भिमाप्पा बेंगार (वय 47, रा. बेंगार चाळ, कासारवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत गुन्हे शाखा युनिट एकचे सहाय्यक पोलीस फौजदार रवींद्र गावंडे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महात्मा फुलेनगर येथे गावठी हातभट्टी दारू विक्री करत होते. याबाबत गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कारवाई केली. त्यात पोलिसांनी 60 लिटर गावठी हातभट्टी दारू, रोख रक्कम असा एकूण 7 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

त्यानंतर आरोपींच्या विरोधात कारवाई करत असताना आरोपींनी पोलिसांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. त्यांनतर पोलिसांशी झोंबाझोंबी करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.