Bhosari crime News : दर्शनासाठी मंदिरात निघालेल्या वृद्धाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज – घराजवळ असलेल्या श्रीकृष्ण मंदिरात दर्शनासाठी निघालेल्या एका वृद्धाला दुचाकीने जोरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी होऊन त्या वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना 2 जानेवारीला सायंकाळी सातच्या सुमारास संत तुकाराम नगर, भोसरी येथे घडली.

शंकर वाघू दळवी (वय 72, रा. संत तुकाराम नगर, भोसरी) असे मृत्यू झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. याबाबत रमेश शंकर दळवी (वय 40) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच 14 / एचझेड 2456 या क्रमांकाच्या दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रमेश यांचे वडील शंकर दळवी 2 जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांच्या घराजवळ असलेल्या श्रीकृष्ण मंदिरात दर्शनासाठी जात होते. रस्त्याने पायी चालत जात असताना त्यांना भरधाव दुचाकीने पाठीमागून धडक दिली. त्यात त्यांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.