Bhosari crime News : जिल्ह्यातून तडीपार केलेल्या आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने भोसरी परिसरातून अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 12) दुपारी दीड वाजता भोसरी येथील मयुरी पॅलेस मंगल कार्यालयाच्या समोरील मोकळ्या मैदानात करण्यात आली.

निखील राजकुमार ढाबळे (वय 23, रा. सावंतनगर, दिघी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी खंडणी दरोडा विरोधी पथकाचे पोलीस नाईक आशिष बोटके यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निखील याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सन 2018 मध्ये दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो पुणे जिल्ह्याच्या परिसरात पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता आला.

याची माहिती खंडणी दरोडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला सापळा लाऊन अटक केली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.