Bhosari Crime News : किरकोळ कारणावरून कुटंबीयांना कोयत्याने मारहाण करणारे अटकेत

एमपीसी न्यूज – भोसरी येथे एका टोळक्याने जुन्या वादातून एका कुटुंबाला कोयत्याने व लाकडी दांड्याने मारहाण केली (Bhosari Crime News) आहे. ही घटना भोसरीतील चक्रपाणी वसाहत येथे सोमवारी (दि.30) रात्री घडली.

 

याप्रकरणी जैद जमशेद नदाफ (वय 18 रा.भोसरी) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी निखील पवळे व साहिल मनोवर यांना अटक केली असून त्यांच्या चार साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

Pimpri News : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील सात अधिकारी सेवानिवृत्त

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चे वडील जमशेद नदाफ व आरोपी निखील यांच्या किरकोळ कारणावरून वाद झाले होते. याच कारणातून निखील व साहिल यांनी त्यांचे साथीदारांसोबत फिर्यादीच्या घरी आले. हातात कोयते फिरवून दोन दुचाकी व रिक्षाची तोडफोड करत दहशत पसरवली. तसेच आज मी तुम्हाला सोडत नसतो, आज एकाला मी मारून टाकतो , अशी धमकी दिली.

 

यावेळी त्याने जमशेद यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केला असता फिर्यादीची बहीण मध्ये पडली. तर तिलाही आरोपीने मारहाण केली. या घटनेत आरोपींनी फिर्यादीचे वडील, आई व बहीण यांना कोयता व लाकडी दांडक्याने मारून जखमी केले.  भोसरी पोलिसांनी आरोपींना अटक केले (Bhosari Crime News) असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.