BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : चाकूचा धाक दाखवून तरुणाचा मोबाईल लंपास

99
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- चाकूचा धाक दाखवून चोरटयांनी तरुणाचा मोबाईल लंपास केला. ही घटना मंगळवारी (दि.23) रात्री दीडच्या सुमारास भोसरी येथील आयप्पा मंदिराजवळ घडली.

या प्रकरणी जयेंद्र पंढरीनाथ टाव्हरे (30, रा. बालाजी नगर, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन दुचाकीस्वार चोरटयांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी टाव्हरे दुचाकीवर जात असताना त्यांच्या मोबाईलवर एक फोन आला. त्यांनी दुचाकी बाजूला घेऊन खिशातून मोबाईल बाहेर काढला. दरम्यान पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरटयांनी टाव्हरे यांच्या दुचाकीची चावी काढून घेतली. तसेच चाकूचा धाक दाखवून त्यांच्या हातातील 13 हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्ती चोरून नेला. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3