Bhosari : मारहाण केल्याची विचारणा केल्यावरून सावत्र भावाने केले चाकूने वार

एमपीसी न्यूज – गावातील एका व्यक्तीला मारहाण केली. त्याबाबत भावाने विचारणा केली असता सावत्र भावाने भावावर चाकूने वार केले. ही घटना शुक्रवारी (दि. 3) सायंकाळी पाचच्या सुमारास बोराडेवाडी रोड, मोशी येथे घडली.

सुनील बाबुराव सस्ते (वय 30, रा. बोराडेवाडी रोड, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विक्रम बाबुराव सस्ते (वय 35) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विक्रम याने बाळू महादेव मोरे (वय 45) यांना लाथाबुक्क्यांनी मारून शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादी सुनील यांनी आरोपी विक्रम याला याबाबत विचारणा केली. या रागातून विक्रम याने सुनील यांना भाजी कापण्याच्या चाकूने मारून जखमी केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक एस बी दरेकर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.