Bhosari : जुन्या भांडणाच्या रागातून महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून चार जणांनी मिळून महिलेला, तिच्या पती व दिराला मारहाण केली. महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉड मारल्याने महिला गंभीर जखमी झाली. ही घटना रविवारी (दि. 17) सकाळी दहाच्या सुमारास भोसरी मधील चक्रपाणी वसाहत जवळ घडली.

माया सागर सावंत (वय 27, रा. चक्रपाणी वसाहत जवळ, भोसरी), सागर सावंत, नितीन सावंत अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी माया यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाबाजी हरचंद्र सावंत (वय 35), राजेश हरिश्चंद्र सावंत (वय 27), मोहन बाबुराव शेगर (वय 35), हरिश्चंद्र बापू सावंत (वय 60, सर्व रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माया यांचे कुटुंब मागील दीड वर्षापासून भोसरी येथील चक्रपाणी वसाहत जवळ असलेल्या मैदानात पाल ठोकून राहत आहे. दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी आरोपी आणि माया यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले. या भांडणाचा राग मनात धरून रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आरोपींनी माया यांच्या पालावर दगड मारले. तसेच माया यांचे पती सागर आणि त्यांचे दीर नितीन यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी राजेश याने माया यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. यामध्ये माया गंभीर जखमी झाल्या. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी राजेश याला अटक केली. आहे भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.