Bhosari Crime News : घरात घुसून महिलेचा विनयभंग, मुलाला मारहाण

हवेत कोयता फिरवून दहशत निर्माण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कोयता घेऊन घरात घुसून महिलेचा विनयभंग केला. त्यानंतर महिलेच्या लहान मुलाला मारहाण करून हवेत कोयता फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 12) रात्री बालाजीनगर, भोसरी येथे घडली.

कृष्णा उर्फ दाद्या भोसले (रा. बालाजीनगर, भोसरी) आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडीत महिलेने मंगळवारी (दि. 13) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घरात एकट्या असताना आरोपी कोयता घेऊन त्यांच्या घरात आले. ‘तुझा मुलगा सागर कुठे आहे’, असे म्हणत आरडाओरडा, शिवीगाळ करून फिर्यादी यांच्या लहान मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी यांच्याशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला.

घरातून बाहेर पडताना आरोपींनी हवेत कोयता फिरवून वस्तीतील लोकांना शिवीगाळ करून दहशत निर्माण केली.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.