Bhosari crime News : भोसरी आणि दिघी परिसरात घरफोडी, सव्वा लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – भोसरी आणि दिघी परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली असून या दोन्ही ठिकाणाहून चोरटयांनी एकूण सव्वा लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरफोडीचा पहिला प्रकार वेदांग अपार्टमेन्ट, पांजरपोळ समोर, भोसरी येथे घडला. या प्रकरणी गोविंद पांडूरंग ठोंबरे (वय 47, रा. वेदांग अपार्टमेन्ट, पांजरपोळ समोर, भोसरी ) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ठोंबरे हे 24 नोव्हेबंर आणि 25 नोव्हेंबर असे दोन दिवस बाहेरगावी गेल्याने त्यांचे घर कुलूप बंद होते. याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप आणि कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोन्याची वेढनी, टॉप्स असा एकूण 1 लाख 10 हजार रुपये वजनाचे दागिने चोरून नेले. भोसरी पोलिस पुढील तपास करत आहेत.

घरफोडीचा दुसरा प्रकार 26 नोव्हेंबर रोजी दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला असून या प्रकरणी प्रमोद हिम्मत खैरनार (वय 36, संत गजानन महाराज नगर, दिघी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनासर, फिर्यादी आणि त्यांची पत्नी कामावर गेले असताना अज्ञात चोरट्यांने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील 15 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.