Bhosari crime News : इंद्रायणीनगरमध्ये घरफोडी; पाच तोळ्यांच्या दागिन्यांसह रोकडची चोरी

एमपीसी न्यूज – इंद्रायणीनगर, भोसरी येथे चोरट्यांनी घरफोडी करून पाच तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अशी एक लाख 87 हजारांची घरफोडी केली. हा प्रकार रविवारी (दि. 4) सकाळी उघडकीस आला आहे.

सुधीर माधव टकले (वय 42, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी टकले दोन ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच्या जुन्नर तालुक्यातील आळे या मूळ गावी गेले होते. दरम्यान त्यांचे घर कुलूप लाऊन बंद होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

घरातून चार तोळ्यांची सोन्याची मोहन माळ, अर्धा तोळ्याचे कानातील डोल, अर्धा तोळ्याचे कानातील वेल आणि 15 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण एक लाख 87 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. रविवारी सकाळी फिर्यादी घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला आहे.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.