Bhosari Crime News : तोंडी तलाक देणाऱ्या पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पत्नीला तोंडी तलाक देणाऱ्या पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना खंडोबा माळ, भोसरी येथे घडली.

आझम पापाभाई पटेल (वय 35), दीर फरीयाज पटेल (वय 32), सासू आणि नणंद (सर्व रा. खंडोबा माळ, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पिडीत विवाहितेने शनिवारी (दि. 20) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 9 एप्रिल 2017 ते 20 मार्च 2021 या कालावधीत भोसरी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे आरोपी पती आझम पटेल याच्याशी लग्न झाल्यानंतर माहेराहून पाच लाख रुपये आण. तसेच तुझ्या पगाराचे पैसे दे, असे म्हणत चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार आरोपींनी आपसांत संगनमत करून विवाहितेचा छळ केला. तसेच जेवायला न देता तिचा शाररीक व मानसिक छळ केला. तसेच आरोपी आझम पटेल याने विवाहितेला तोंडी तलाक दिला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.