Bhosari Crime News : सहकारी कर्मचारी महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – एकाच कंपनीत काम करत असताना सहकारी महिलेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. त्यानंतर महिलेच्या फिर्यादीवरून गैरवर्तन करणा-या सहका-यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

हा प्रकार 1 ऑक्टोबर 2018 ते 3 ऑक्टोबर 2020 या कालावधीत एमआयडीसी भोसरी परिसरात घडला. याबाबत 6 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

श्रीकांत तुकाराम वीरकर (वय 37, रा. तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी एमआयडीसी भोसरी येथील एका इंजिनिअरिंग कंपनीत एकत्र काम करतात. 1 ऑक्टोबर 2018 ते 1 ऑक्टोबर 2020 या कालावधीत आरोपीने फिर्यादी महिलेसोबत वेळोवेळी लगट करण्याचा प्रयत्न केला.

‘तू मला आवडतेस, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही’ असे म्हणत महिलेचा पाठलाग केला. कंपनीच्या बाहेर भेटायला बोलावत तसेच तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.