Bhosari Crime News : वाटणीपत्रावरुन दोन कुटुंबांत हाणामारी ; परस्परविरोधी गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – सामाईक जमिनीच्या वाटणी पत्रावरुन दोन कुटुंबांत हाणामारी झाली. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी दिलेल्या तक्रारींवरून भोसरी एमआयडीसी पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. इंद्रायणी पार्क कॉलनी, मोशी याठिकाणी सोमवारी (दि.24) ही घटना घडली.

प्रज्वल सुरेश काळे (वय 21, रा. इंद्रायणी पार्क कॉलनी, मोशी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंकुश फुगे (वय 52), उषा अंकुश फुगे (वय 46), गणेश अंकुश फुगे (वय 22), स्वप्नाली गणेश फुगे (वय 22), भारती मयुर गोळे (वय 25, सर्व रा. इंद्रायणी पार्क कॉलनी नं 1, मोशी, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच उषा अंकुश फुगे (वय 46, रा. इंद्रायणी पार्क कॉलनी, मोशी) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून प्रज्वल सुरेश काळे (वय 21), शिवशंकर साहेबराव काळे (वय 52), सरला शिवशंकर काळे (वय 47), भानुदास सहदेवराव ढोक (वय 54), निता भानुदास ढोक (वय 49) (सर्व रा. इंद्रायणी पार्क कॉलनी नं.1, मोशी, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाईक जमिनीच्या वाटणी पत्रावरुन या दोन्ही कुटुंबांत हाणामारी झाली. यावरून दोन्ही कुटुंबांनी परस्परविरोधी फिर्याद दिली. त्यानुसार दोन्ही कुटुंबातील दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घिगे व पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.