Bhosari Crime News : तलवारी बाळगल्याप्रकरणी चौघांना अटक; सव्वालाखाचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – दोन दुचाकीवरून जाणाऱ्या चार जणांच्या टोळक्याकडे तीन तलवारी मिळून आल्या. ही घटना भगत वस्ती, भोसरी येथे मंगळवारी सायंकाळी घडली. या आरोपींकडून सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आकाश गुलाब गायकवाड (वय 25 रा. दिघीगाव), दादाहरी लक्ष्मण तांबे (वय 22, रा. एमआयडीसी भोसरी), आनंद नारायण कोलते (रा. गजानन नगर, दिघी) आणि अक्षय नाना जगदाळे (वय 20 रा. विठ्ठलनगर, पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस नाईक सचिन विश्वास मोरे यांनी मंगळवारी (दि. 27) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दुचाकीवरून चार आरोपी चालले होते. पोलिसांनी त्यांना अडवले असता त्यांच्याकडे तीन तलवारी मिळून आल्या. त्यानुसार पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्याकडील तीन तलवारी, दोन दुचाकी आणि चार मोबाईल, असा एकूण एक लाख 24 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.