Bhosari Crime News : विवाहितेचा जबरदस्तीने गर्भपात करणाऱ्या पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच तिचा गर्भपात केल्याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित विवाहितेच्या फिर्यादीनुसार पती अजिंक्य गणपत कोळेकर, सासरे गणपत श्रीरंग कोळेकर, सासू कल्पना गणपत कोळेकर (रा. चिंचवड), नणंद प्रियंका हेमंत वाघमोडे (रा. मठाचीवाडी, ता. फलटण, जि. सातारा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून विवाहिता सासरी नांदत असताना तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.

तिला उपाशी पोटी ठेऊन शिवीगाळ, दमदाटी करत तिला वारंवार मारहाण केली. तिच्या इच्छेविरुद्ध तिचा गर्भपात केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.