Bhosari Crime News : दररोज एक टक्का नफ्याचे आमिष दाखवून चार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – दररोज एक टक्का (Bhosari Crime News ) नफा मिळेल, असे आमिष दाखवून व्यावसायीकाची चार लाखांची फसणूक करण्यात आली आहे. ही फसणूक 12 एप्रिल 2018 ते 3 फेब्रुवारी 2023 या कालावधीत चक्रपाणी वसाहत भोसरी येथे घडली.

शशिकांत राजाराम देसाई (वय 50, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आळंदी येथील एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad News : राजे उमाजी नाईक यांचा स्मृतिदिन साजरा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  आरोपी महिलेने ओथ्री ऑस्सम प्रा ली या कंपनीत गुंतवणूक केल्यास प्रतिदिवस एक टक्का जास्तीचा नफा मिळवून देण्याचे फिर्यादी यांना सांगितले. त्यावर विश्वास ठेऊन देसाई यांनी चार लाख रुपये गुंतवले. दररोज एक टक्का नफा मिळणाऱ्या स्कीममध्ये पाच वर्षात देसाई यांना त्यांनी गुंतवलेल्या रक्कमेतून केवळ 10 हजार 200 रुपये परत मिळाले. उर्वरित तीन लाख 89 हजार 800 रुपये मुद्दल आणि त्यावरील नफा न देता त्यांची आरोपीने फसवणूक केली.
यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस (Bhosari Crime News ) पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.