Bhosari crime News : नटबोल्टची एजन्सी मिळवून देण्याच्या बहाण्याने 25 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – एका कंपनीच्या नट बोल्टची एजन्सी मिळवून देतो, असे सांगून एका व्यक्तीची 24 लाख 91 हजार 800 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार इंद्रायणीनगर, भोसरी येथे 4 फेब्रुवारी 2019 ते 29 जानेवारी 2021 या कालावधीत घडला.

मनोज गजानन माने (वय 50, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल सुभाषचंद्र मिश्रा (रा. भांडूप, मंबई) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टीव्हीएस कंपनीच्या नटबोल्टची एजन्सी मिळवून देतो, असे आरोपीने फिर्यादी माने यांना सांगितले. त्यासाठी व मालासाठी लागणारी रक्कम मला द्या, असेही आरोपी म्हणाला. त्यानुसार माने यांनी वेगवेगळ्या अकाऊंटवर व रोख स्वरुपात रक्कम दिली. मात्र आरोपीने कसलीही एजन्सी दिली नाही.

तसेच अभिनय इंजिनियरिंग वर्क्स या कंपनीची परचेस ऑर्डर देऊन फिर्यादीकडून मटेरियल नेऊन त्याचेही पैसे फिर्यादीला परत न देता फिर्यादी 24 लाख 91 हजार 800 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.