Bhosari Crime News : बनावट कागदपत्रांच्या आधारे 6 कोटी 83 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – मालाचा पुरवठा केल्याचे दाखवण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार करून त्याआधारे दोन वर्षांच्या कालावधीत तब्बल 6 कोटी 83 लाख 7 हजार 678 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार भोसरी-प्राधिकरण येथे उघडकीस आला आहे.

मथु के नरसिंव्हा, बाळासाहेब डोके, निलेश कदम, ज्ञानेश्वर गुळींग, संचालक गंगा आयर्न अंड स्टील ट्रेडिंग कंपनी ली.  मुंबई, संचालक सुदर्शन फोर्ज अँड स्टील वर्ल्ड पिंपरी, संचालक प्रीती इंटरनशनल (गोपाल ओ रुईया एच यु एफ) मुंबई, संचालक रुईया अलॉय प्रा.  ली.  मुंबई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सत्यानंद सुर्यानाथ सिंग (वय 62, रा. दहिसर इस्ट, मुंबई) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मथु, बाळासाहेब, निलेश आणि ज्ञानेश्वर हे फिर्यादी यांच्या सिंग अँड संस फर्म या कंपनीत काम करत होते.

त्यांनी अन्य आरोपींसोबत मिळून सन 2018 ते 2020 या कालावधीत लोखंडी मालाचा पुरवठा केल्याचे दाखवून त्याबाबत खोट्या टीसी, खोटे इनवाईस बिल व बनावट कागदपत्रे बनवून फिर्यादी यांच्या संस्थेची 6 कोटी 83 लाख 7 हजार 678 रुपयांची आर्थिक फसवणूक केली.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.