Bhosari Crime News : ‘गोल्डमॅन’च्या खून प्रकरणातील आरोपीला पिस्तूलासह अटक

तिघांना बेड्या; तीन पिस्तुल, सहा काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज – गोल्डमॅन दत्ता फुगे यांच्या खून प्रकरणातील आरोपी आणि त्याच्या दोन साथीदारांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्या तिघांकडून पोलिसांनी तीन पिस्तुल आणि सहा जिवंत काडतूसे जप्त केली आहेत.

प्रमोद ऊर्फ कक्‍का संतराम धौलपूरिया, प्रसन्ना ऊर्फ सोनू ज्ञानेश्‍वर पवार (वय 26) आणि अंकुश ऊर्फ तात्या रंगनाथ डांगले (वय 29, सर्व रा. भोसरी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी गणेश सावंत यांना माहिती मिळाली की तिघेजण भोसरी परिसरात संशयितरित्या थांबले आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 93 हजार 400 रुपयांचे तीन पिस्तुल आणि सहा जिवंत काडतूसे पोलिसांनी जप्त केली.

आरोपी धौलपूरिया हा गोल्डमॅन दत्ता फुगे यांच्या खूनातील आरोपी आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.