Bhosari Crime News : माहेरहून दहा लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – माहेरहून दहा लाख रुपये आणण्याची मागणी करत सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. हा प्रकार 21 नोव्हेंबर 2019 पासून 8 मार्च 2020 या कालावधीत इचलकरंजी, कोल्हापूर येथे घडला.

याबाबत पीडित महिलेने आठ जुलै 2021 रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती सुशांत सुनील नगरकर (वय 27), दीर सचिन सुनील नगरकर (वय 31), नितीन सुनील नगरकर (वय 29), चुलत सासरे नरेश वसंत नगरकर (वय 55), महिला आरोपी (सर्व रा. इचलकरंजी, कोल्हापुर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहिता पतीसह सासरी नांदत असताना आरोपींनी विवाहितेला किरकोळ कारणावरून शिवीगाळ व मारहाण केली. तसेच आई-वडिलांकडून दहा लाख रुपये घेऊन ये, अशी पैशांची मागणी केली. यावरून आरोपींनी पीडित विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.