Bhosari Crime News : घर घेण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – घर घेण्यासाठी वडिलांकडून दहा लाख रुपये आणण्याची मागणी करत सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. याबाबत चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना फेब्रुवारी 2021 पासून चार एप्रिल 2021 या कालावधीत चक्रपाणी वसाहत रोड, भोसरी येथे घडली.

अक्षय (वय 26), बेबी सुर्यकांत निकाळजे (वय 45), सूर्यकांत खंडू निकाळजे (वय 50), अनिकेत सूर्यकांत निकाळजे (वय 24, सर्व रा. गायकवाड चाळ, चक्रपाणी वसाहत रोड, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित विवाहितेने भोसरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 20) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहिता सासरी नांदत असताना आरोपींनी आपसात संगणमत करून विवाहितेला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. विवाहितेला शिळे अन्न खायला दिले. तसेच उशिरापर्यंत उपाशीपोटी ठेवले. ‘घर घेण्यासाठी वडिलांकडून दहा लाख रुपये घेऊन ये नाहीतर घरातून निघून जा. नाहीतर तुला आम्ही मारून टाकू’, अशी आरोपींनी विवाहितेला धमकी दिली.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.