Bhosari Crime News : ऑक्सिजनचा औद्योगिक वापर ; भोसरीतील कंपनी सील 

एमपीसी न्यूज – ऑक्सिजनचा औद्योगिक वापर केल्याने कंपनी सील करण्यात आली आहे. भोसरी एमआयडीसीतील आकार लेझर इंडस्ट्रीज या कंपनीवर महसूल विभागाने आज (शनिवारी, दि‌.15) ही कारवाई केली. 

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून ऑक्सिजनचा औद्योगिक वापर करण्यास मनाई केली आहे. भोसरी एमआयडीसीतील आकार लेझर इंडस्ट्रीज या कंपनीत ऑक्सिजनचा वापर होत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार संयुक्त पथकाने पाहणी केली.

पाहणीत कंपनीत दोन सिलेंडरचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार कंपनीला सील करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या तहसीलदार गीता गायकवाड, नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, भोसरीचे मंडलाधिकारी गणेश सोमवंशी, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी गवारे, राज्याच्या उद्योग विभागाचे पुणे येथील सहसंचालक सदाशिव सुरवसे यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.