Bhosari Crime News : विधवा महिलेचे लैंगिक शोषण करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिचे 2018 सालापासून लैंगीक शोषण करणाऱ्याला भोसरी पोलिसांनी अटक केली (Bhosari Crime News) आहे.

मुर्गेशन गिरिराजपिल्लाई श्रीधर (वय 54 रा. मोशी) असे अटक आरोपीचे नाव असून पीडित महिलेने मंगळवारी (दि.31) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पीडिता ही विधवा व एकटी आहे याचा गैरफायदा घेत आरोपीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवले नोव्हेंबर 2018 पासून तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केले.

Pimpri News : कवी केशवसुत ही कोणाची खाजगी मालमत्ता नाही- श्रीपाल सबनीस

मात्र अद्यापही लग्न न करता तिची फसवणूक केली. यावरून भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत (Bhosari Crime News) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.