Bhosari Crime News : वडिलांच्या नावावरील घर पतीच्या नावावर करण्यासाठी विवाहितेचा छळ

0

एमपीसी न्यूज – वडिलांच्या नावावर असलेले घर पतीच्या नावावर करून देण्याची मागणी सासरच्या मंडळींनी विवाहितेकडे केली. तसेच लग्नात द्यायचे ठरलेले 15 तोळे सोन्याचे दागिने पूर्ण न दिल्याने राहिलेले दागिने आणावेत आणि घरखर्चासाठी देखील माहेरहून पैसे आणावेत अशी मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला.

हा प्रकार 9 जून 2019 ते 6 एप्रिल 2021 या कालावधीत घडला.

पती मानसिंग भारत कु-हाडे (वय 30), सासू यशोदा भारत कु-हाडे (वय 53), नणंद अर्चना भारत कु-हाडे (तिघे रा. काटेपुरमनगर, पिंपळे गुरव), सुवर्णा अनिल बामणेकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत 34 वर्षीय पिडीत विवाहितेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेच्या लग्नात 15 तोळे सोन्याचे दागिने देण्याचे ठरले होते. मात्र, माहेरच्या लोकांनी पूर्ण दागिने दिले नाहीत. राहिलेले दागिने घेऊन येण्याची मागणी करत सासरच्या लोकांनी विवाहितेला शिवीगाळ करून तिचा छळ केला.

विवाहितेच्या वडिलांच्या नावावर असलेल्या दोन घरांपैकी एक घर पतीच्या नावावर करून देण्याची मागणी केली. घरखर्च भागवण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची देखील आरोपींनी मागणी केली. या सर्व कारणांवरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment