Bhosari Crime News : हुंड्यासाठी होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – लग्नातील हुंड्यापोटी माहेरहून दुचाकी आणण्याची मागणी करत सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. हा प्रकार 21 एप्रिल रोजी चक्रपाणी वसाहत भोसरी येथे घडला.

प्रेम चंद्रेश्वर गिरी (वय 42, रा. बिहार) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती मनोरंजनकुमार हरेंद्र भारती (वय 21), सासु कांतीदेवी हरेंद्र भारती (वय 38), सासरे हरेंद्र भुवनेश्वर भारती (वय 43, सर्व रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 19 वर्षीय मुलीचा आरोपी मनोरंजनकुमार याच्यासोबत सात डिसेंबर 2020 रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर पंधरा दिवसांनी सासरच्या मंडळींनी फिर्यादी यांच्या मुलीकडे  ‘लग्नात तुझ्या वडिलांनी हुंडा दिला नाही, तू हुंडा म्हणून माहेरवरून मोटर सायकल घेऊन ये’ अशी मागणी केली.

माहेरहून दुचाकी आणली नाही म्हणून आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलीला मारहाण केली. तिला जेवण दिले नाही. सासरच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या मुलीने 21 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता चक्रपाणी वसाहत भोसरी येथील राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने छताच्या हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.