Bhosari Crime News : कंपनीमधून मटेरियल, बंद पडलेल्या ट्रकमधून भंगार चोरीला

एमपीसी न्यूज – कंपनीच्या गेटवरून उडी मारून अर्धवट उघड्या असलेल्या शटर मधून आत प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी कंपनीमधून 85 हजारांचे मटेरियल चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 22) पहाटे एमआयडीसी भोसरी मधील ट्रीटार्क इक्यूमेंट प्रा ली या कंपनीत घडली. तर बंद पडलेल्या ट्रकमधून एक लाख 12 हजार रुपये किंमतीचे भंगार चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना पिंपरी येथे 9 सप्टेंबर रोजी उघडकीस आली.

संजय बाजीराव पोकळे (वय 47, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी कंपनीतील मटेरीयल चोरीला गेल्याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस  ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एमआयडीसी भोसरी येथे ट्रीटार्क इक्यूमेंट प्रा ली या कंपनीत काम करतात. बुधवारी सकाळी कामावर आल्यानंतर कंपनीच्या वॉचमनने फिर्यादी यांना सांगितले कि, अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या गेटवरून उडी मारून अर्धवट उघड्या असलेल्या शटर मधून आत प्रवेश करून चोरट्यांनी 85 हजारांचे मटेरियल चोरून नेले.’ त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

बंद पडलेल्या ट्रकमधून भंगार चोरीस गेल्या प्रकरणी राम जनार्दन बगदुरे (वय 45, रा. हडपसर, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी राम यांचा (एम एच 12 / के पी 3312) हा ट्रक आंबेडकर चौक, पिंपरी येथील ग्रेड सेपरेटरमध्ये 8 सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास बंद पडला. दरम्यानच्या काळात फिर्यादी यांचे नातेवाईक वारल्यामुळे ते गावी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजताच्या सुमारास त्यांना ट्रकमधील एक लाख 12 हजार रुपये किंमतीचे लोखंडी भंगार चोरीस गेल्याचे दिसून आले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.