Bhosari Crime News : भोसरी परिसरातील गुन्हेगार सूरज गायकवाड टोळीवर मोक्काची कारवाई

एमपीसी न्यूज – एमआयडीसी भोसरी परिसरातील सराईत गुन्हेगार सूरज गायकवाड टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी शुक्रवारी (दि. 23) आदेश दिले आहेत.

टोळी प्रमुख सूरज ऊर्फ डिप्शा महादेव गायकवाड (वय 21, रा. लकी स्क्रॅप सेंटर मागे, महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी, पुणे), जावेद लालसाहब नदाफ (वय 22, रा. नाल्याजवळ, महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी, पुणे), अजय बाळू ससाणे (वय 22, रा. मस्जिद जवळ, महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी, पुणे), ओंकार ऊर्फ आण्णा बाळू हजारे (वय 25, रा. वेताळनगर, चिंचवड, पुणे) अशी कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सूरज गायकवाड आणि त्याच्या साथीदारांवर दुखापत, जबरी चोरी, विनयभंग करणे, जबर दुखापत, बेकायदा जमाव जमवून दरोडा घालणे, खंडणी उकळण्यासाठी गंभीर दुखापत करणे, खूनाचा प्रयत्न करणे व बेकायदेशीररित्या घातक शस्त्रे जवळ बाळगणे असे एकूण 12 गुन्हे एमआयडीसी भोसरी, भोसरी व चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

ही टोळी वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत होती. या टोळीवर कारवाई करण्याचा प्रस्ताव एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अपर पोलीस आयुक्तांकडे पीसीबी गुन्हे शाखेमार्फत पाठवला. त्याबाबत अपर आयुक्तांनी मोकाची कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.