Bhosari crime News : महिलेचा अश्लील व्हिडीओ नातेवाईकांना पाठवून विनयभंग; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – महिलेचा अश्लील व्हिडीओ आणि तिच्या बहिणीचा फोटो तिच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर पाठवून विनयभंग केल्याचा प्रकार सोमवारी (दि. 5) रात्री साडेनऊ वाजता भोसरी येथे घडला आहे. याबाबत पोलिसांनी व्हिडीओ पाठवणा-या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

हसन सादिककुसेन कांसीवाला (वय 23, रा. अंधेरी, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पिडीत महिलेच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादीचा अश्लील व्हिडीओ काढून त्याच्या व्हाटसअपवर पाठवण्यात सांगितले.

फिर्यादीने तो व्हिडीओ आरोपीच्या मोबाईलवर पाठवला. त्यानंतर आरोपीने फिर्यादी महिलेचा अश्लील व्हिडीओ आणि तिच्या बहिणीचा फोटो महिलेच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर पाठवून तिचा विनयभंग केला.

याबाबत आरोपी विरोधात भारतीय दंड विधान कलम 354, 507, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चे कलम 67, 67 (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.