Bhosari Crime News : लग्न करत नाही म्हणून फेसबुकवरुन महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – लग्न करत नाही म्हणून फेसबुक आणि फोनवरुन महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आहे. फेब्रुवारी 2021ते 5 मार्च दरम्यान भोसरी परिसरात ही घटना घडली.

याप्रकरणी पीडित महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैभव पांडुरंग गावडे (रा. कात्रज, मूळगाव – बेळगाव, कर्नाटक) याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिला लग्न करत नाही या कारणावरून फेसबुक व फोनच्या माध्यमातून तिची बदनामी केली. तसेच महिलेची बहिण व नातेवाईक यांना ‘तिनं माझ्याशी लग्न केलं नाही तर, आत्महत्या करेन’, व ‘तिला अडकवेन’, अशी धमकी दिली.

याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.