Bhosari crime News : अल्पवयीन मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विनयभंग; तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करून तिला वारंवार भेटण्यास बाहेर बोलावले. मुलीने नकार दिला असता तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. याबाबत एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभम लक्ष्मण कुंभार (वय 20, रा. राजवाडा, इंद्रायणीनगर, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पिडीत मुलीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पिडीत अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केले. त्यानंतर तिला भेटण्यासाठी वारंवार बाहेर बोलावले. मुलीने बाहेर भेटण्यासाठी नकार दिला असता आरोपी तरुणाने तिला मोबाईल फोनवर मेसेज करून शिवीगाळ केली.

तसेच तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. याबाबत तरुणाच्या विरोधात विनयभंगासह बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.