Bhosari crime News : अभ्यासासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे ; तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – अभ्यासासाठी घरी आलेल्या अल्पवयीन मुलीसोबत ( Minor Girl) एकाने अश्लील चाळे केले. याप्रकरणी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 26) रात्री साडेआठ वाजता गवळीमाथा भोसरी ( Gawali matha) येथे घडली.

अमितकुमार शिमला शाह (वय 32) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या 28 वर्षीय नातेवाईक महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात ( Midc Bhosari Police station)  फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची 12 वर्षीय भाची तिच्या मैत्रिणीसोबत आरोपीच्या घरी शिकवणी व अभ्यासासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीने पीडित मुलीला बाजूला ओढून तिच्याशी अश्लील चाळे केले. मुलगी मोठ्याने ओरडली असता तिच्या पाठीत मारून कुणाला काही सांगू नको, असे म्हटले.

‘जर तू कुणाला सांगितले तर मी तुला सोडणार नाही’ अशी धमकी आरोपीने दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.