Bhosari Crime News : दुकानासमोर ठेवलेले एक लाख दहा हजारांचे स्टील मटेरियल चोरीला

एमपीसी न्यूज – दुकानासमोर विक्रीसाठी ठेवलेले स्टील मटेरियल चार चोरट्यांनी चोरून नेले. दुकानदाराला सुऱ्याचा धाक दाखवून तसेच दुकानदाराच्या भावाच्या पायावर रिक्षाचे चाक घालून एक लाख दहा हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.

पोलिसांनी एका आरोपीला याप्रकरणी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 3) पहाटे दोन वाजताच्या सुमारास गवळीमाथा भोसरी येथील शालीमार स्टील या दुकानासमोर घडली.

राहुल रमेश पवार (रा. पाटील इस्टेट झोपडपट्टी, वाकडेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासोबत त्याच्या तीन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अस्लम आशीकअली चौधरी (वय 31, रा. पिंपरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांचे गवळीमाथा भोसरी येथे शालीमार स्टील नावाचे दुकान आहे. मंगळवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास आरोपी राहुल त्याच्या तीन साथीदारांसोबत रिक्षातून आला. त्याने फिर्यादी यांना सुऱ्याचा धाक दाखवला. तसेच फिर्यादी यांचा भाऊ फिरोज चौधरी यांच्या पायावर रिक्षाचे चाक घालून त्यांना जखमी केले. त्यानंतर आरोपींनी जदुकानासमोर विक्रीसाठी ठेवलेले एक लाख दहा हजार रुपये किमतीचे स्टील मटेरियल जबरदस्तीने चोरून नेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.