Bhosari crime News: घराचे ग्रील तोडल्याचा जाब विचारल्यावरून एकावर चाकू हल्ला

एमपीसी न्यूज – ‘भावाच्या घराचे ग्रील का तोडले’ असा जाब विचारणाऱ्याला दोघांनी मिळून एकावर चाकूने हल्ला केला. मंगळवारी (दि. 15) सकाळी सात वाजता लांडगे भोसरी, फुलेनगरयेथील म्हातारीच्या गोठ्याजवळ ही घटना घडली.

अनिल लक्ष्मण वेताळ (वय 40, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी चन्या व डीप्श्या (पूर्ण नावे माहिती नाहीत, दोघे रा. फुलेनगर भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी वेताळ यांच्या भावाच्या घराचे ग्रील तोडले. त्याचा जाब वेताळ यांनी आरोपींना विचारला.

यावरून आरोपींनी वेताळ यांच्या अंगाशी झटापट करून पाठीवर आणि छातीवर चाकूने भोकासले. यामध्ये वेताळ गंभीर जखमी झाले.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.