Bhosari crime News: बुलेटच्या धडकेत पादचारी महिला ठार

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणा-या बुलेटने रस्ता ओलांडत असलेल्या महिलेला धडक दिली. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. हा अपघात शनिवारी (दि. 19) रात्री पावणे अकरा वाजता पुणे-नाशिक महामार्गावर लांडगेनगर, भोसरी येथे घडला.

बुलेट चालक हर्शल बाळासाहेब हरिहर (वय 21, रा. जय गणेश साम्राज्य, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार ए. व्ही. पवार यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावरून आरोपी हर्शल त्याच्या बुलेट दुचाकीवरून (एमएच 14 / जीक्यू 0190) भरधाव वेगात जात होता. लांडगेनगर येथे एक महिला रस्ता ओलांडत होती.

भरधाव बुलेटने रस्ता ओलांडत असलेल्या महिलेला जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. महिलेची अद्यापपर्यंत ओळख पटलेली नाही.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.