-MPC-TOP-MOST-BANNER-I

Bhosari Crime News : एटीएम सेंटरवरील दरोड्याचा डाव पोलिसांनी उधळला; दोघांना अटक, पाच जणांवर गुन्हा

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – इंद्रायणीनगर, भोसरी ( Bhosari) येथील युनियन बॅकेचे एटीएम सेंटरवर ( Union Bank ATM ) दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीतील दोघांना खंडणी,  दरोडा विरोधी पथकाने (Ransom, anti-robbery squad) अटक केली तर अन्य तिघे पसार आले. शनिवारी (दि.23) भोसरी येथील इंद्रायणीनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली.

सुरजितसिंग राजपालसिंग टाक (वय 32, रा. बिरादारनगर, हडपसर, पुणे) व जितसिंग राजपालसिंग टाक (वय 26, रा. बिरादारनगर, हडपसर, पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

तर संतोष काळे (रा. रा. बिरादारनगर, हडपसर, पुणे), अमरसिंग जगरसिंग टाक (रा. बिरादारनगर, हडपसर, पुणे) व सनीसिंग पापासिंग दुधाणी (रा. बिरादारनगर, हडपसर, पुणे) पसार झाले. या सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी खंडणी, दरोडा विरोधी पथकाचे पोलीस नाईक नितीन बाळासाहेब लोखंडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व आरोपी इंद्रायणीनगर, भोसरी येथील युनियन बॅकेचे एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते.

त्यासाठी त्यांनी  कारमध्ये ( एमएच 12/ डीएस 2605) 2 लाख 6 हजार 600 रूपये किंमतीचे दोन बोअर कटर, दोन स्क्रु ड्रायव्हर, दोरी, दोन कोयते आदी साहित्य दरोडा टाकण्यासाठी जवळ बाळगले होते. दरोडा विरोधी पथकाने छापा मारुन पाचपैकी दोघांना ताब्यात घेत अटक केली. तर अन्य पसार झाले.

पुढील तपास दरोडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरिक्षक मंगेश भांगे करत आहेत.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.