Bhosari Crime News : संजय गांधीनगर झोपडपट्टीतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सात जणांना अटक

एमपीसी न्यूज – एमआयडीसी भोसरी पोलिसांनी बोराडेवाडी, मोशी येथील संजय गांधीनगर झोपडपट्टी येथे सुरु असलेल्या एका मटका जुगार अड्ड्यावर छापा मारला. त्यात पोलिसांनी सात जणांना अटक केली असून त्यांच्याकडून एक लाख 66 हजार 320 रुपये किमतीचे साहित्य जप्त केले आहे.

सोहेल अखिल शेख (वय 27, रा. वल्लभनगर, पिंपरी), सतीश बारकराव लोखंडे (वय 30, रा. बोराडेवाडी, मोशी), विशाल तुकाराम गायकवाड (वय 23, रा. काळेवाडी, पिंपरी), राहुल चांगदेव साळवे (वय 20, रा. बोराडेवाडी, मोशी), भारत सुभाष सुधारे (वय 40, रा. बोराडेवाडी मोशी), शेख (वय 32, रा. आदर्शनगर, मोशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलीस शिपाई स्वप्नील बाळासाहेब लांडगे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोराडेवाडी मोशी येथील संजय गांधीनगर झोपडपट्टी येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये मटका जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारून एक लाख 66 हजार 320 रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. तसेच सात जणांना अटक केली.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.