Bhosari Crime News : बनावट कागदपत्रांच्या आधारे डाऊनपेमेंटवर तीन दुचाकींची खरेदी

एमपीसी न्यूज – बनावट कागदपत्रांच्या आधारे तीन दुचाकी डाऊनपेमेंटवर खरेदी केल्या. याबाबत तीन जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 21 ते 26 नोव्हेंबर 2020 रोजी पुणे-नाशिक रोडवर गुडवीन सुझुकी मोटर्स या शोरूममध्ये घडला.

किरणकुमार शशिकांत पेडणेकर (वय 34, रा. वसई), अनिल नामदेवराव नवथळे (वय 31, रा. अकोला), बाळू (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अजिंक्य उमेश बनसोडे (वय 29, रा.दिघी ) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भोसरी येथे गुडवीन सुझुकी मोटर्स हे शोरूम आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्या शोरूममधून बनावट कागदपत्रे सादर करून त्याआधारे तीन दुचाकी डाऊनपेमेंटवर खरेदी केल्या. ही बाब तीन आठवड्यानंतर निदर्शनास आली. त्यानंतर याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.