Bhosari crime News : पूर्ववैमनस्यातून आरडाओरडा करत टोळक्याचा राडा

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून सहा जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके घेऊन आरडाओरडा करत राडा घातला. तसेच एकाला धमकी देत शिवीगाळ केली. हा प्रकार रविवारी (दि. 17) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास आदिनाथ नगर, भोसरी येथे घडली.

शालोम संतोष कदम, ऋतिक माने, रोहित राठोड (सर्व रा. आदिनाथ नगर, भोसरी) आणि त्यांचे इतर तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नारायण रंगनाथ चंदेल (वय 49, रा. आदिनाथ नगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या घरातील लोक घरात बसलेले असताना आरोपी तिथे आले. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी रोहित याने ‘तुझ्या मुलाला लय मस्ती चढलेली आहे. खाली ये तुझे तंगडेच तोडतो’ अशी फिर्यादी यांना धमकी दिली.

त्यानंतर आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या घरच्यांना शिवीगाळ केली. आरोपी ऋतिक यानेही फिर्यादी यांना ‘घरातून बाहेर बिल्डिंगच्या खाली ये. तुझे लय झाले आहे. आम्ही काय तुझ्या सारखे भाडेकरू आहे काय. तुला व तुझ्या मुलाला ठारच करतो’ असे म्हणत धमकावले.

आरोपींनी जोरजोरात ओरडून धमकी देऊन शिवीगाळ व दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.