Bhosari Crime News : अल्पवयीन मतिमंद मुलीवर बलात्कार

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मतिमंद मुलीवर 23 वर्षीय तरुणाने बलात्कार केला. याबाबत पीडित मुलीच्या 35 वर्षीय आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 4) दुपारी जय महाराष्ट्र चौक, आळंदी रोड, भोसरी येथे घडली.

दीपक लक्ष्मण शिनगारे (वय 23, रा. भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 16 वर्षीय मतिमंद मुलीला आरोपीने एका बिल्डिंगमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलीने हा प्रकार घरातील लोकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर याबाबत तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.