Bhosari crime News : शेत जमीन नावावर करण्याच्या आमिषाने महिलेवर बलात्कार

एमपीसी न्यूज – पती घरात नसल्याचे पाहून ‘पती कुठे गेले आहेत’, असे विचारत जबरदस्ती घरात घुसलेल्या नराधमाने गावाकडील पाच एकर शेतजमीन नावावर करतो’ असे म्हणत महिलेवर बलात्कार केला. ही घटना भोसरी परिसरात घडली.

उमेश तम्माराय साबळे (रा. चिंचपुरता, दक्षिण सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 25 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 5 मार्च 2020 रोजी घडली. फिर्यादी महिलेचे पती घरी नसताना ‘पती कुठे गेले आहेत’ असे विचारण्याच्या बहाण्याने आरोपी महिलेच्या घरात आला.

त्याने घराचा दरवाजा आतून बंद करून ‘तू मला खूप आवडतेस. माझ्या सोबत चल. मी तुझ्या नावावर गावाकडील पाच एकर शेतजमीन करतो’ असे म्हणत महिलेवर बलात्कार केला.

घडलेल्या प्रकाराबाबत कुणाला काही सांगितल्यास महिलेसह तिच्या मुलीला ठार मारण्याची धमकी दिली. महिलेने याबाबत सुरुवातीला सोलापूर जिल्ह्यातील मुन्द्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. तिथून हा गुन्हा भोसरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.