Bhosari Crime News : रिक्षाचालक महिलेचा विनयभंग; एकाला अटक

एमपीसी न्यूज – रिक्षाचालक महिलेचा हात पकडून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना टेल्को रोड, येथे शुक्रवारी (दि. 13) दुपारी घडली.

संजीवकुमार हरीहर साह (वय 27, रा. खुतहा, भोजपूर, बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पिडीत महिलेने शुक्रवारी (दि. 13) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही रिक्षा चालक आहे. आरोपी त्यांच्या रिक्षात बसून यशवंत चौक, टेल्को रोड येथे दुपारी दीड वाजताच्या सुमारास उतरला. मला पुण्याला जायचे आहे, असे सांगून आरोपी साहू याने फिर्यादी यांचा मोबाइल नंबर घेतला. त्यानंतर दुपारी चार वाजेपर्यंत फिर्यादी रिक्षा चालक महिलेचा पाठलाग केला. पुन्हा फिर्यादी यांना भेटून मेरा नाम संजित शहा है, मुझे 35 हजार पगार है, असे बोलून आणखी अश्‍लिल बोलत फिर्यादी यांचा हात पकडून विनयभंग केला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.