Bhosari Crime News : दूध विक्री करुन जमवलेले 70 हजार रुपये चोरीला

एमपीसी न्यूज – दूध वितरण आणि विक्री करून जमवलेले 70 हजार 500 रुपये दोन अनोळखी चोरट्यांनी चोरून नेले. हा प्रकार सोमवारी (दि. 7) सकाळी साडेनऊ वाजता फुलेनगर, चक्रपाणी रोड, भोसरी येथे घडला.

सुनील विठ्ठलराव सूर्यवंशी (वय 40, रा. धानोरी, पुणे) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील सूर्यवंशी हे त्यांच्या तीनचाकी टेम्पोमधून दूध वितरणाचे काम करतात. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता ते दूध वितरण करून पैसे गोळा करत होते. त्यांनी दूध वाटप करून जमलेले 70 हजार 500 रुपये तीन चाकी टेम्पोच्या सीटखाली ठेवले होते. फुलेनगर येथील विजय प्रोव्हिजन स्टोअर्सच्या समोर टेम्पो थांबून ते दुकानात पैसे घेण्यासाठी गेले असता दोन अनोळखी चोरट्यांनी टेम्पोच्या सीट खालून 70 हजार 500 रुपये रोख रक्कम चोरून नेली. त्यानंतर चोरटे मोपेड दुचाकीवरून पळून गेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.