Bhosari Crime News : सराईत गुन्हेगाराकडून सात दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज – एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एका सराईत गुहेगराला अटक केली आहे. त्याच्याकडून 2 लाख 25 हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

जीवन नाना गिरगुणे (वय 23, रा. मु.पो मिरजगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या वाहन चोरट्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी परिसरातून एम एच 14 / एफ एन 8436 ही दुचाकी चोरीला गेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार विशाल काळे यांना माहिती मिळाली की, अहमदनगर जिल्ह्यातील सराईत चोरटा जीवन याने हा गुन्हा केला आहे. पोलिसांनी तांत्रिक मदतीने आरोपीचा शोध घेऊन जीवन याला कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथून ताब्यात घेतले.

त्याच्याकडून तीन पल्सर, एक हॉर्नेट, एक अ‍ॅक्टिवा, एक पॅशन प्रो व एक होंडा शाईन अशा एकूण 2 लाख 265 हजार रुपयांच्या 7 दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे एमआयडीसी भोसरी मधील 3, दिघी, पिंपरी येथील प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, पोलीस निरीक्षक(गुन्हे) सतीश नांदुरकर उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे, पोलीस नाईक संजय भोर,पोलीस अंमलदार नवनाथ पोटे, विजय दांडकर, करन विश्वास, अनिल जोशी, रहिम शेख, विशाल काळे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.