Bhosari Crime News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; पीडित मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघडकीस

एमपीसी न्यूज – जेवण वाढण्याच्या बहाण्याने घरात बोलावून एका 30 वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत कुणाला काहीही न सांगण्याची धमकी दिली. अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना मार्च ते एप्रिल 2021 या कालावधीत संत तुकाराम नगर, भोसरी येथे घडली.

याबाबत 30 वर्षीय व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने 11 वर्ष सहा महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला जेवण वाढण्याच्या बहाण्याने घरात बोलावून घेतले. तसेच पीडित मुलीच्या घरात झोपण्याचा बहाणा करून तिच्यावर पाच ते सहा वेळा लैंगिक अत्याचार केला. याबाबत घरातील लोकांना काही सांगू नकोस अशी आरोपीने पीडित मुलीला धमकी दिली.

मात्र अल्पवयीन पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.