Bhosari crime News :पुणे – नाशिक महामार्गावर विचित्र अपघात; विजेच्या धक्क्याने रस्त्यावर पडलेल्या पादचाऱ्याच्या अंगावरून गेला ट्रक

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या डिव्हायडरच्या जाळीत वीजप्रवाह उतरला. रस्ता ओलांडणा-या एका पादचारी व्यक्तीला विजेचा धक्का बसला. यामध्ये पादचारी व्यक्ती गंभीर जखमी झाला. त्यानंतर जाळीत पाय अडकल्याने रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीच्या अंगावरून ट्रक गेल्याने त्यात त्या व्यक्तीचा जागेवर मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 19) सायंकाळी साडेसातच्या सुमारास धावडेवस्ती भोसरी येथे घडली.

मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, धावडे वस्ती, भोसरी येथील रोशन गार्डन समोरील रस्त्यावर असलेल्या डिव्हायडरमध्ये विजेचा खांब आहे. या खांबापासून अरुंद रस्ता आहे. तिथून पादचारी नागरिक रस्ता ओलांडतात. सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एक व्यक्ती हा रस्ता ओलांडत होती. त्यावेळी विजेचा धक्का बसल्याने डिव्हायडरच्या जाळीत पाय अडकून पादचारी व्यक्ती रस्त्यावर पडली.

यामध्ये पादचारी व्यक्ती जखमी झाली. विजेचा धक्का लागून रस्त्यावर पडल्यावर जखमी व्यक्तीच्या अंगावरून ट्रक गेला. यामध्ये जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, याला भोसरी पोलिसांनी दुजोरा दिला नाही.

भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेले आहे.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.