Bhosari Crime News : तरुणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

एमपीसी न्यूज – एका तरुणाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला, तसेच तिला वारंवार अश्‍लिल मेसेज पाठवले. तरुणाच्या या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. ही घटना इंद्रायणीनगर, भोसरी येथे एप्रिल 2018 ते 6 सप्टेंबर 2020 या कालावधीत घडली.

याप्रकरणी मृत मुलीच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 30 वर्षीय तरुणाच्या विरोधात विनयभंग व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीस वर्षीय आरोपीने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. तसेच तिला वारंवार अश्‍लिल मेसेज पाठविले. या त्रासाला कंटाळून मुलीने 6 सप्टेंबर रोजी राहत्या घराच्या गॅलरीमधून उडी मारून आत्महत्या केली.

पोलीस उपनिरीक्षक सावर्डे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.