Bhosari Crime News : कंपनीत पाण्याचे टँकर पुरविण्याच्या कारणावरून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या तिघांना बेड्या

भोसरी पोलिसांची कारवाई :

एमपीसी न्यूज – कंपनीत पाणी पुरवण्याच्या कारणावरून सहा जणांनी मिळून एका व्यावसायिकावर कोयत्याने वार करत भर रस्त्यात त्याचा खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. 14) दुपारी खेड तालुक्यातील म्हाळुंगे गावात घडली. या गुन्ह्यातील तीन आरोपींना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.

आकाश उर्फ गण्या रवि घरमाळे (वय 20, रा. तुपे आळी, म्हाळुगे इंगळे, ता. खेड, जि. पुणे), ऋषीकेश उर्फ गोट्या सुनिल भालेराव (वय 20, रा. बौध्दवाडा, भिमनगर, म्हाळुंगे इंगळे, ता. खेड, जि. पुणे), अभिषेक बुध्दसेन पांडे (वय 18, रा. अंकुश पवार यांची रूम, पवारवाडी, खालूम्बरे, ता. खेड, जि. पुणे. मुळ रा. नर्मदा मंदीरामागे, अमरकंटक, जि. जबलपुर, राज्य मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

अतुल तानाजी भोसले, असे खूनी हल्ला झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याबाबत अक्षय पंडित बो-हाडे (वय 26 रा. म्हाळुंगे, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मयत अतुल भोसले यांचा कंपनीत पाणी सप्लाय करण्याचा व्यवसाय आहे. पाण्याचे टॅंकर पुरवण्याच्या कारणावरून अतुल भोसले आणि आरोपी अक्षय शिवले या दोघांमध्ये फोनवरून वाद झाला. त्या कारणावरून चिडून आरोपी अक्षय शिवले आणि त्याच्या साथीदारांनी अतुल भोसले यांच्यावर कोयत्याने वार करत भररस्त्यात त्यांच्यावर खुनी हल्ला केला. यामध्ये अतुल भोसले यांचा मृत्यू झाला.

या गुन्ह्यातील तीन आरोपी भोसरी स्मशानभूमीजवळ येणार असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी स्मशानभूमीजवळ सापळा लावून तिघांना अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ- एक) मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर कैलासे, पोलीस अंमलदार गणेश हिंगे, गणेश सावंत, सुमित देवकर, विनोद वीर, समिर रासकर व संतोष महाडिक यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.