Bhosari Crime News : घरासमोर थांबलेल्या महिलेला तरुणाने मारला डोळा  

एमपीसी न्यूज – घरासमोर थांबलेल्या महिलेला  डोळा मारून हाताने खुणावले  तसेच तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग करणाऱ्या  तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनोद उर्फ बाळू धुळी कांबळे (वय 28, रा. महात्मा फुले नगर, दापोडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार सोमवारी (दि. 15) दुपारी दोन वाजता महात्मा फुले नगर, दापोडी येथे घडला. फिर्यादी महिला तिच्या घरासमोर थांबली असताना आरोपीने तिच्याकडे पाहून शिट्टी मारून डोळा मारला. त्यानंतर तिला हाताने खुणावून तिचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.