Bhosari Crime News : एमआयडीसी भोसरी मधील कंपनीत 49 हजार रुपयांची चोरी

एमपीसी न्यूज – भोसरी एमआयडीसी मधील हिंदुस्तान प्रेसिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत एका चोरट्याने चोरी करून 49 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 10) सकाळी उघडकीस आली.

बाळासाहेब सिताराम अंबुरे (वय 46, रा. चिंचवड) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमीर हुसेन शेख (वय 27 रा. रिंगरोड, पिंपरी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी मधील हिंदुस्तान प्रेसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील कंपाउंडवर चढून आरोपीने कंपनीत प्रवेश केला. कंपनीतून 49 हजार रुपये किमतीचे सात प्रेसिंग मटेरियल डायचे कॉइल आरोपी आमीर याने चोरून नेले. हा प्रकार रविवारी रात्री आठ ते सोमवारी सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास घडला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.